ENG vs NZ: न्यूझीलंडच्या संघाने अनोख्या पद्धतीने केली आपल्या फलंदाजाच्या कृतीची भरपाई

ENG vs NZ: न्यूझीलंडच्या संघाने अनोख्या पद्धतीने केली आपल्या फलंदाजाच्या कृतीची भरपाई

न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल फलंदाजी करत असताना त्याने मारलेला एक उत्तुंग षटकार प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला.

क्रिकेटचा सामना सुरू असताना सर्वांचे लक्ष मैदान खेळणाऱ्या खेळाडूंकडे असते. मात्र, त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये अनेक मजेशीर घटना घडत असतात. मैदानात चित्रिकरणासाठी उपस्थित असेलेल्या छायाचित्रकारांच्या कॅमेऱ्यांमध्ये कधी-कधी अशा घटना कैद होतात. इंग्लंड आणि न्यूझीलंडदरम्यान सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यात अशीच एक घटना घडली. न्यूझीलंडचा फलंदाज डेरिल मिशेल फलंदाजी करत असताना त्याने मारलेला एक उत्तुंग षटकार प्रेक्षकांमध्ये जाऊन पडला. या षटकारामुळे न्यूझीलंडच्या धावसंख्येत वाढ तर झाली मात्र, नंतर संघाला त्याची भरपाई देखील करावी लागली.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून यष्टिरक्षक टॉम ब्लंडेल ६७ आणि डेरिल मिशेल ८१ धावांवर नाबाद आहेत. मिचेलने आपल्या अर्धशकीय खेळीत नऊ चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या एका षटकाराचा चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये बसलेल्या चाहतीच्या हातातील बीअर ग्लासमध्ये जाऊन पडला. बीअर सांडल्यामुळे इंग्लंडच्या या चाहती नाराज झाली. डेरिल मिशेलच्या षटकाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Susan – the lady earlier who Daryl Mitchell’s pint hit – has been given a replacement by the Kiwi team ???#ENGvNZ pic.twitter.com/53ig2R5cML— England’s Barmy Army (@TheBarmyArmy) June 10, 2022

न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ५६व्या षटकात हा प्रकार घडला. सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करत असलेला इंग्लंडचा गोलंदाज मॅथ्यू पॉट्सने हा प्रकार आपल्या सहकाऱ्यांना सांगितला. तर, बीबीसीसाठी समालोचन करत असलेल्या फिल थफनेलने यांनीही मिश्किल पद्धतीने हा किस्सा जगजाहीर केला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी मिशेलला शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्याला उत्तुंग षटकार मारण्याची संधी देऊ नये. कारण, प्रेक्षकांच्या बीअरचे नुकसान होत आहे, असे फिल म्हणाले.

हेही वाचा – VIDEO: याला म्हणतात नशीब! चारवेळा प्रयत्न करूनही फलंदाजाला धावबाद करण्यात अपयश

हा प्रकार न्यूझीलंडच्या संघाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आपला चांगुलपणा दाखवता पुन्हा एकचा क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. मिशेलच्या षटकारामुळे ज्या चाहतीची बीअर सांडली होती तिच्यासाठी न्यूझीलंडच्या संघाने नवीन बीअर खरेदी करून दिली. इंग्लंड संघाचे समर्थक असलेल्या ‘बर्मी आर्मी’ या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती देण्यात आली. या चाहतीचे नाव सुसॅन असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय दिवसाचा खेळ संपल्यानंतर मिशेलने स्वत: या चाहतीची भेट घेतल्याचेही फोटोही न्यूझीलंड क्रिकेटच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status