कोणी मला न्याय मिळवून द्याल का ? शेतकऱ्याचं प्रश्नाचं उत्तर देईल कुणी ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


मुंबई : धनवीरसिंग ठाकूर , २ वर्षां पेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. तरी एक शेतकरी समूह त्यांना कुणी न्याय देईल ह्या अपेक्षेत आहेत. भारत देश हा कृषी प्रधान देश जरी असला तरी मात्र ते धान्य उगविणाऱ्या शेतकऱ्यांची बळीच येथे हि शासन व्यवस्था घेत असून. वर्षानु वर्ष प्रलंबित प्रकरणे , गुन्हेगारी , लबाडी आणि फसवणूक होऊन सुद्धा.
पुरावे असतांना सुद्धा , कुणीही शेतकर्यांची बाजू घेण्यास राजी नाही. कारण त्यात त्यांना आपला कुठलाच ‘ आर्थिक फायदा ‘ दिसत नाही. हे मत आहे ह्या आंदोलन कर्ते शेतकऱ्यांचं कारण पोलीस , कोर्ट , जिल्हाधिकारी ह्या सर्वांनीच त्यांना फक्त आश्वासने दिली मात्र कुणीही त्या पुढे ह्यांना खरंच न्याय मिळाला का नाही ? ह्याची पुष्टी करण्याची साधी तसदी नाही घेतली. कुणीच आपलं काहीही ऐकून घेत नसतांना तब्बल ३ ते ४ कोटी एवढी मोठी रकमेची हि लबाडी झाल्याची असल्याने त्यांना अत्यन्त बिकट परिस्थिती ला सामोरे जावे लागत असून. आज जवळपास ५० शेतकरी कुटुंब जे ह्या कथित कोठारी नामक फसव्या व्यापारीं मुळे त्रस्त आहेत.
त्यांना रस्त्यावर येण्याची पाळी आली आहे. सुनील गुज्जर आणि त्यांच्या पत्नी ह्यांनी मानसिक रित्या आघात होत असल्यामुळे आता पर्यंत दोन वेळा अग्निदाह करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु , आपल्या देशातील अंध न्याय व्यवस्थेला त्यांची कुठलीच दया आलेली दिसत नसून. ह्या शेतकरी कुटुंबाने आम्हाला दिलेल्या मुलाखती मध्ये राज्य शासन कडे ईच्छा मृत्यू मागणी घालून संपूर्ण परिवार आत्महत्या करणार असल्याचे बोलून दाखविले आहे.
एक आनंदी शेतकरी समूह आज दोन वेळे च्या अन्न वस्त्र निवाऱ्या साठी दोन्ही हात जोडून शासन ह्यांना न्याय मिळवून देईल का ? ह्या अपेक्षेत आजाद मैदान मुंबई येथे पुन्हा आमरण उपोषण करण्यास बसले आहेत. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !