विधान परिषदेसाठी काँग्रेसची यादी जाहीर, भाई जगताप-चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

विधान परिषदेसाठी काँग्रेसची यादी जाहीर, भाई जगताप-चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी

भाजपनंतर आता काँग्रेसनेही उमेदवार घोषित केले आहेत. काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे.काँग्रेसकडून मोहन जोशी, सिद्धार्थ हत्ती अंबरे, हर्षवर्धन संकपाळ, संजय दत्त, सचिन सावंत, अतुल लोंढे यांच्या नावांची चर्चा होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, दिल्लीतून जगताप आणि हंडोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.भाजपने विधान परिषदेसाठी प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि राम शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पंकजा मुंडेंना डावलून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीत एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत यांच्यासह 10 जागांवर येत्या 20 जूनला मतदान होणार आहे. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. 22 जुलै रोजी या 10 आमदारांची मुदत संपत आहे.हेही वाचाभाजपकडून विधान परिषद उमेदवारांची नावं निश्चित, पंकजा मुंडेंना संधी नाहीच

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status