कोड नेम ‘ वसुली भाई ‘ मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन च्या अवैध वसुली बहाद्दर ची करम कहाणी उघड : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


मलकापूर : धनवीरसिंग ठाकूर , मलकापूर शहर ह्यात प्रमुख दोन पोलीस स्थानका पैकीच एक म्हणजे ग्रामीण पोलीस स्टेशन ज्यांची हद्द शहराच्या आजू बाजू वसलेल्या खेडे पाडे ह्यांचे पर्यंत आहे.
येथील सर्वच अवैध धंदे धारकां कडून बक्कळ रक्कम शिताफीने सदर वसुली पोलीस कर्मचारी अनेक वर्षां पासून करत आहे.
अवैध ब्लास्टिंग , गौण खनिज उत्तखनन , देशी दारू विक्रेता , गावठी बनावटीची दारू , रेती तस्कर आणि गुटखा , सट्टा , पत्ता सारखे अवैध धंदे धारकां कडून दर महा लाखो रुपयांची लाच हफ्ते सुरळीत रित्या घेणे सुरु असल्यामुळे ह्या सर्व अवैध धंदे धारकांची बारमाही दिवाळी सुरु आहे.
परंतु , कार्य तप्तर पोलीस निरीक्षक श्री. मिरझा ह्यांचेच स्टेशन मध्ये कार्यरत हा वसुली कर्मचारी आज पर्यंत कुठल्याच कार्यवाही पात्र नाही. असे झाले कसे ?
काही बड्या अवैध धंदे करणार्यां साठी हे वसुली कर्मचारी मद्यस्थी मांडवली एजेंट सुद्धा आहे.
नुकत्याच बाहेर आलेल्या २२ जानेवारी २०२३ गुटखा प्रकरणात हि संबंधित गुटखा व्यापारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण बिट अधिकारी मध्ये समजौता घडवून १५ ऐवजी ३ लाख रुपयात डील घडवून आणण्याचा पराक्रम हि ह्याच पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. ज्याची उघड रित्या सार्वजनिक स्तरावर शहर भरात चर्चा सुरु आहे.
संबंधित पोलीस कर्मचारी आपल्या पदाचा आणि आपल्याला असलेल्या जबाबदारी तसेच सामाजिक न्याय व्यवस्थेची असलेली जबाबदेही ह्याची पूर्ण रित्या आर्थिक स्वरूपात बजावणी करीत आहे. ग्रामीण हद्दीत असलेले सर्व अवैध धंदे धारक अति विश्वासाने आमची दर महा एन्ट्री ग्रामीण पोलीस स्टेशन ला संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव घेऊन करत आहेत. असे असतांना ग्रामीण नागरिकांनी न्याय व्यस्थेची अपेक्षा कशी करावी ?
स्थानिक ग्रामीण अवैध धंदे धारकां कडून सदर बाबतीची ऑन रेकॉर्ड प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधी ह्यांना मिळाल्या आहेत.
सदर भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांची त्वरित पोलीस सेवेतून रवानगी होऊन ? स्थानिक अन्य पोलीस दलाच्या कर्मचारी ह्यांना ह्या सारख्या लालचेतून बाहेर येण्या साठी उदाहरण घडणे गरजेचे झाले आहे. वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते ह्यांचे मार्फत पुढील येत्या काळात कुठलीच कार्यवाही न झाली असल्यास ? ह्या बाबतीचे निवेदन हि पोलीस विभागाला देऊन पाठपुरावा करण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान आपल्या पोलीस स्टेशन मधील ह्या वसुली भाई ची काय कार्यवाही माननीय पोलीस निरीक्षक मिरझा साहेब करतील ह्या कडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया !