बातम्या

पिंपरी चिंचवडसह कसबा पेठेत भाजपकडून उमेदवार कोण असणार? चंद्रकांत पाटील यांनी केलं सूचक विधान

पिंपरी चिंचवडसह कसबा पेठेत भाजपकडून उमेदवार कोण असणार? चंद्रकांत पाटील यांनी केलं सूचक विधान

बिनविरोध निवडणूक करण्यासाठी महेश लांडगे यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली असून राष्ट्रवादी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आवाहन करू असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी 26 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दोन्ही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे होते. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीलाच भाजपकडून संधी देण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत आज पुण्याचे पालकमंत्री तथा भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. बिनविरोध निवडणूक करण्यासाठी निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातच उमेदवारी द्यायची त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईल अशी स्थिती भाजपकडून निर्माण केली जाणार असल्याचे संकेत चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदे दरम्यान निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही भेटणार असल्याचे म्हंटले आहे.
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडची निवडणूक कशी बिनविरोध होईल यासाठी प्रयत्न करत असून बैठकांचे सत्र सुरू आहे.
पत्रकार परिषदेदरम्यान चंद्रकांत पाटील म्हणाले 27 फेब्रुवारीला मतदान होणार होते मात्र मतदानाचा टक्का वाढवा यासाठी 26 फेब्रुवारीचे नॉटिफिकेशन आयोगाने जाहीर केले आहे.
निवडणूक बिनविरोधात होईल यासाठी प्रयत्न आहे, परंतु वेळेवर उमेदवार दिल्यास गाफील न राहता तयारीसाठी आजची बैठक घेण्यात आले आहे.
उमेदवार ठरण्याची प्रक्रिया आज झाली नाही, कोअर कमिटीकडून पार्लमेंटरी बोर्ड यांच्याकडून केंद्रात निर्णय होत असतो. त्यामुळे दिल्लीतून उमेदवारी जाहीर होईल.
सभा, प्रचार आणि बैठका यासाठी ही बैठक झाली, राजकीय समन्वय, घटक पक्षाशी चर्चा, बिनविरोधात निवडणूक करण्यासाठी महेश लांडगे पिंपरीत काम पाहणार आहे.
दोन्ही ठिकाणी मुरलीधर मोहोळ हे दोन्ही ठिकाणी संपर्क करणार आहे. राजकारणात काम करत असतांना उमेदवारी करण्यासाठी इच्छा व्यक्त करणे गुन्हा नाही असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.
इच्छा व्यक्त करण्यासाठी, उमेदवार ठरविण्यासाठी नव्हती, किती मतदान मागच्या वेळी, निवडणूक झाली तरी जिंकण्यासाठी काय करावे, यासाठी बैठक झाल्याचं म्हंटलं आहे.
बिनविरोध निवडणूक करण्यासाठी महेश लांडगे यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली असून राष्ट्रवादी अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे आवाहन करू असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हंटलं आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status