स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण बिट अधिकाऱ्या द्वारे ३ लाखांची मांडवली : एक्स्ल्युजिव रिपोर्ट : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


मलकापूर : धनवीरसिंग ठाकूर , बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण बिट च्या एक महिला अधिकारी तर्फे मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील कार्यरत एक सहकारी कॉन्स्टेबल कर्मचारी सोबत मिळून तब्बल ३ लाख रुपयांची लाच घेऊन गुटखा माल सोडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे , महाराष्ट्र राज्यात सध्या गुटखा , तंबाकू जन्य पदार्थांचे विक्री , साठवण , उत्पादन हे पूर्ण पणे प्रतिबंधित आहे. तरी काही गुटखा तस्कर आजू बाजू च्या राज्यानं मधून खेडे पाडे आड मार्गाने गुटखा हा आपल्या जिल्ह्यात आणून त्याची अवैध पूर्तता करीत आहेत. सजग पोलीस प्रशासनाच्या नजरेखालून एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा जिल्ह्यात येत असतांना ह्या अवैध गुटखा तस्करांना लाखो रुपयांची प्रतिबंधित गुटखा माल ने आन करण्यात कुठलीच भीती का नाही ? नक्कीच मोठा विश्वास त्या मागे असल्या शिवाय हे तस्कर एवढी मजल मारू शकत नाहीत. एखाद्या साध्या छोट्या मालवाहू वाहनात हि लाखो रुपयांचा गुटखा माल ने आन दिवसा ढवळ्या येथे सुरु आहे.
हि घटना आहे , २२ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळ ६ ते ७ च्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण बिट च्या एक महिला कर्मचारी ह्यांना हि पक्की बातमी मिळाली होती. मुक्ताईनगर शेतरस्त्यां द्वारे देवधाबा आणि पुढे येथून आडमार्गे जांभुळधाबा ते देवधाबा ह्या रस्त्याने एक मालवाहू ट्र्क लक्षावधी रुपयांचा गुटख्या सह शहरात आला.
स्थानिक ग्रामीण पोलीस ह्यांची हद्द असल्यामुळे येथील एक तथा कथित मांडवली घडवून आणणारा पोलीस कर्मचारी ह्या ठिकाणी पोहोचला. आणि मालवाहू ट्र्क ह्यांनी पकडून अडवून तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागणी गुटखा तस्कर व्यापारी ला केली परंतु , ह्या बाबतीत त्यांचे एकमत जुळून आले नाही. पुन्हा ‘ईदगाह ‘ जवळ त्यांनी भेटून ३ लाख रुपयां मध्ये ट्र्क सोडण्याचे ठरवून ट्र्क ला ३ लाख रुपयांची लाच घेऊन सोडले. आणि तो गुटखा माल शहरात पोहोचला.
कुणाला हि कानो कान खबर न लागता लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जिल्ह्यात पोहोचला.कारण शहरात मुख्य रस्त्याने न शिरता आडमार्ग गावांच्या रस्त्याने हि पूर्ण ‘ मांडवली डील ‘ घडली.
दरम्यान नवनियुक्त शिस्तीचे पक्के आणि न्याय दक्ष पोलीस अधीक्षक श्री.सारंग आव्हाड साहेब सोबत जिल्हा न्यायदंडाधिकारी ह्या प्रकरणात गाम्भीर्याने लक्ष देऊन काय कार्यवाही करतील ह्या कडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून. पुढील होणाऱ्या सर्व कार्यवाही कडे प्रसार माध्यमांचे लक्ष लागून. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !