घातक डायनामाइट स्फोटके अवैध रित्या उघड विक्री खरेदी : प्रशासन झोपेत आहे का ? : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


बुलढाणा : धनवीरसिंग ठाकूर , मलकापूर आणि लगतच्या ईतर शहरांमधून घातकी स्फोटके डायनामाईट डेटोनेटर अवैध रित्या मोठ्या प्रमाणावर बेफाम खरेदी विक्री सुरु आहे. हे घातक स्फोटक पदार्थ मोठी जीवित जैविक तसेच मालसमान हानी घडवून आणण्यात सक्षम आहेत. सोलर ब्रॅण्ड नागपूर येथील कंपनी जी भारत देशाच्या सेना दलांना अधिकृत रित्या शस्त्र दारुगोळा पुरविते त्याच कंपनीच्या स्फोटक उत्पादनांची बेधडक विक्री कशी शक्य आहे ?
शेकडो किलो डायनामाईट कुठल्याच योग्य परवाने , सांभाळ किव्हा दक्षता विना ने आण करून वाट्टेल त्या इसमाला कुठलीही चाचणी न घेता विक्री करण्याचे मोठे नेटवर्क सक्रिय आहे.
काही वर्षात बुलढाणा जिल्हा मधून अनेकदा आतंकवादी संघटनेशी निगडित व्यक्तींना पकडण्यात आले आहे. तसेच ह्या पूर्वी आपण येथे अत्यंत भयंकर जातीय हिंसा आणि दंगली घडतांना बघितल्या आहेत. असे असतांनाही स्फोटक पदार्थ खुले आम विक्री सहज पणे येथे होत असल्याची आपण बघू शकतो. स्थानिक पोलीस प्रशासन आणि जबाबदार अधिकारी कुठलेही जबाबदारी स्वीकारण्यास सरसावत नसल्याचे उघड सत्य समोर येत आहे. वारं वार ह्या स्फोटक तस्करांची माहिती देऊनही पोलीस प्रशासन आपल्याला मिळत असणाऱ्या मंथली हफ्त्यां मुळे सूचक कानाडोळा सदर बाबती कडे करीत आहेत.
गावोगावी शेतां मधील विहीर आणि इतर गौण खनिज काढण्यासाठी ह्याचा सर्रास वापर मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. प्रत्येक ब्लास्टिंग कर्नाऱ्याजवळ ९० पावर च्या मायनिंग डायनामाईट डेटोनेटर सहज आढळत आहेत. कुठल्याही प्रशिक्षण , योग्य निगाह न बाळगता मोठ्या प्रमाणावर सुरु असलेल्या ह्या घातकी प्रकाराची दाखल जिल्हा पोलीस प्रशासन घेतील का ? पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकारी कुठल्या मोठ्या घटनेची वाट बघत आहेत का ? इथे राहणाऱ्या नागरिकांच्या प्राणांची शास्वती पोलीस प्रशासन ह्यांचे वर नाही का ? अश्या प्रकारची माफक प्रश्ने नागरिक उचलत आहेत. दरम्यान पोलीस दल सदर बाबतीत सज्ञान घेऊन काय कार्यवाही करतील ह्या कडे सर्व सामान्य जनतेचे लक्ष लागून. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !