
जळगाव मिरर / २५ जानेवारी २०२३ भडगाव शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून फोन वर व समक्ष धमकी देऊन भडगाव येथील एका हॉटेलच्या रूम मध्ये घेऊन जात इच्छा नसताना बळजबरीने शारीरिक संबध केला म्हणून एका विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला पोस्को सह इतकं कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत […]
The post भडगाव हादरल : अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेत अत्याचार first appeared on Jalgaon Mirror News.
भडगाव हादरल : अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेत अत्याचार
जळगाव मिरर / २५ जानेवारी २०२३
भडगाव शहरातील एका परिसरात वास्तव्यास असलेल्या १६ वर्षीय तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून फोन वर व समक्ष धमकी देऊन भडगाव येथील एका हॉटेलच्या रूम मध्ये घेऊन जात इच्छा नसताना बळजबरीने शारीरिक संबध केला म्हणून एका विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला पोस्को सह इतकं कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी- विजय पाटील रा. यशवंत नगर भडगाव याने अल्पवयीन तरुणीचा वेळोवेळी पाठलाग करून तरुणीशी फोनवर तसेच समक्ष धमकी देऊन तरुणीला बोलण्यास भाग पाडून तरुणीला दोस्तांना हॉटेल भडगाव येथे भेटण्यास बोलावले.
दरम्यान दोस्तांना हॉटेलच्या रूम मध्ये तरुणीची इच्छा नसताना बळजबरीने शरीर संबध केला. तसेच तरुणीला बळजबरीने मोटार सायकलवर बसून पाचोरा रेल्वे स्टेशन येथे घेऊन गेला. तसेच तरुणी ही तिचे मामा कडे जळगाव येथे गेली असताना तेथे जाऊन तरूनीस बळवून घेऊन जाण्याचा ईशारा करून पळून गेला.
विजय पाटील रा. भडगाव याच्या विरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला गु. र. न.19/2023 भा. द. वी. कलम 376(1), 354(ड), 506, 507, सह लैं.गु.बा. स. अधिनियम 2012 चे कलम 3(अ), 4, 11, (1)/12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे हे करीत आहे.
The post भडगाव हादरल : अल्पवयीन मुलीला हॉटेलवर नेत अत्याचार first appeared on Jalgaon Mirror News.