एअरटेल वापरकर्त्यांनो लक्ष द्या! तुम्हालाही KYC साठी मेसेज किंवा कॉल येतोय ? वेळीच व्हा सावधान

एअरटेल वापरकर्त्यांनो लक्ष द्या! तुम्हालाही KYC साठी मेसेज किंवा कॉल येतोय ? वेळीच व्हा सावधान

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध राहा. एअरटेल कंपनीची ग्राहकांना चेतावणी.

मोबाइल वापरणारा प्रत्येकजण कमीत कमी खर्चात अधिक फायदे मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी तो नवनवीन ऑफर्स आणि डिस्काउंट रिचार्जच्या शोधात असतो. हॅकिंग आणि ऑनलाइन फसवणूक करणारे लोक सर्व प्रकारच्या आकर्षक ऑफर्सचे आमिष दाखवून सर्वसामान्यांना लुटत आहेत. आजकाल असाच एक हॅकर ग्रुप सक्रिय झाला आहे जो केवायसीच्या बहाण्याने एअरटेलच्या ग्राहकांना आपला बळी बनवत आहे. ज्याबद्दल कंपनीने ग्राहकांना इशारा दिला आहे.

एअरटेलचा इशारा

एअरटेल कंपनीच्या अनेक ग्राहकांना अभिनंदन संदेश पाठवले जात असून त्यात त्यांना केवायसी करण्यास सांगितले जात आहे. असे संदेश कॉलद्वारे देण्यासोबतच अनेक सोशल मीडिया पोस्ट आणि व्हॉट्सॲप मेसेजद्वारे देखील पाठविले जात आहेत. या संदेशांमध्ये म्हटलंय , एअरटेल ग्राहकांनी त्यांचा नंबर केवायसी करून घेतला तर त्यांना मोफत भेट आणि रोख बक्षीस दिले जाईल. मात्र , एअरटेलने आपल्या ग्राहकांना चेतावणी दिली आहे की जर त्यांना अशा प्रकारचा कोणताही संदेश, कॉल किंवा लिंक आली तर त्याला अजिबात प्रतिसाद देऊ नये.

मोफत ऑफरचे आमिष

एअरटेल वापरकर्त्यांना कॉल किंवा मेसेजद्वारे केवायसी करून घेण्यासाठी रोख बक्षिसे आणि मोफत भेटवस्तू दिल्या जात आहेत. या मेसेज आणि लिंक्समध्ये केवायसीच्या नावाने यूजर्सची कागदपत्रे मागवली जात आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या कागदपत्रांच्या किंवा कंपनीच्या नावाने पाठवलेल्या संदेशात नमूद केलेला ओटीपी सांगितला , सांगितला ,तर त्याच वेळी त्या वापरकर्त्याचे बॅकिंग तपशील हॅक केले जातात. या फसवणुकीमुळे सर्वसामान्यांचे बँक खाते हॅक केले जात असून, त्यांच्या फोनमधील सध्याचा डेटाही ट्रॅक करता येतो.

स्पॅम संदेश नेटवर्क

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि एसएमएसद्वारे मोफत लाभ, बक्षिसे, योजना, कॅशबॅक या नावाने अनेक संदेश फॉरवर्ड केले जातात. यातील ९९.९९ टक्के संदेश हे फसवे असतात , जे हॅकर्सद्वारे पसरवले जातात. मोबाईल वापरकर्ते फुकटच्या लालसेपोटी असे मेसेज एकमेकांना पाठवतात आणि यामुळे अनेक लोक घोटाळ्यांना बळी पडतात. अशा संदेशावर क्लिक करण्यापूर्वी, प्रत्येक वापरकर्त्याने कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन खात्री केली पाहिजे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status