७ कोटींचा महसूल गडप : जामनेर कृषी बाजार प्रशासक ह्यांची संशयास्पद भूमिका : एक्स्ल्युजिव स्टोरी : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


जळगाव : धनवीरसिंग ठाकूर , जामनेर येथील शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ५ किमीच्या आतील कोठारी बंधू ह्यांचे अवैध खाजगी कृषी उत्पन्न बाजार द्वारे आज पावेतो तब्बल ७ कोटी रुपयांची शासकीय महसुलाची बुडवणूक होऊन सुद्धा शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक अधिकारी ह्यांची कुठलीच हालचाल का नाही ? बुडविण्यात आलेली अपेक्षित रक्कम हि कमी नसून तब्बल ७ कोटी रुपयांची असल्या ची हि खात्रीलायक बातमी आहे.
शासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती ह्यांचे निकष आणि नियमांच्या पायमल्ली करून अवैध रित्या बांधकाम करण्यात आलेलं जामनेर येथील पाचोरा रस्त्यावरील महावीर ऍग्रो मार्केट खाजगी कृषी खरेदी विक्री साठी उभारण्यात आलेले आहे. सदर मार्केट ज्या ग्राम पंचायत हद्दी मध्ये आहे. तेथील कागदी रेकॉर्ड मध्ये असे कुठलेच नोंद नाहीत. वा अधिकृत परवानगी नाही. शासकीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ५ किलोमीटर त्रिज्येच्या आवारात कुठलेच अन्य खाजगी वा शासकीय बाजार बांधण्याची कायद्याने प्रतिबंध असतांना देखील स्थानिक शासकीय कृषी उत्पन्न बाजार ह्यांचे २.५ किमी अंतराच्या च्या दरम्यान बांधण्यात आलेल्या ह्या खाजगी बाजाराची आज पावेतो ६ वर्षात कुठलीच कार्यवाही का झालेली नाही ? सहकार आयुक्त जिल्हा ह्यांचे द्वारे अधिकृत पत्र लिहून कळविण्यात आलेले असतांना देखील स्थानिक बाजार प्रशासन आणि संचालक मंडळ संशयास्पद भूमिकेत का आहेत.
शहरातील नागरिकांच्या चर्चे मधून कोठारी बंधू ह्यांचे तर्फे शासकीय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक ह्यांना भरघोस लाच रक्कम आणि हफ्ते मिळत असल्यामुळे कोट्या वधी रुपयांचा अधिकृत शासकीय महसूल हि सोडून देण्यात येत आहे. आणि त्याच कारणामुळे आज पावेतो सदर अवैध मार्केट वर कुठलीच कार्यवाही झालेली नाही असे स्पष्ट रित्या बोलल्या जात आहे.
जामनेर येथील कोठारी बंधू कोण आहेत ?
महावीर ऍग्रो मार्केट खाजगी संचालक आणि मालक कोठारी बंधू अनेक वर्षां पासून आवारातील शेतकर्यां कडून शेतकरी माल खरेदी विक्री करण्याचे काम करतात. जामनेर येथील कोठारी बंधू ह्यांचे वर आज पर्यंत दोन ते तीन शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्याचेही गंभीर आरोप आहेत.
सदर कोठारी व्यापारी तर्फे सावकारी तत्वांवर व्याजाने रुपये वाटण्याचेही गंभीर आरोप येथील स्थानिक शेतकरी ह्यांचे मार्फत केल्या जात आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलन किव्हा तक्रारींना आपल्या आर्थिक बळावरून झुगारून लावत असल्याचेही आरोप येथील पीडित शेतकरी करीत आहेत.
संबंधित बाबतीत कोठारी बंधू ह्यांचेशी संपर्क केले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला आहे. जालना येथील शेतकऱ्याची जवळपास २ कोटी आणि नेरी येथील शेतकऱ्याची ३ कोटी आणि स्थानिक प्रशासनाची ७ कोटी तब्बल १२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक बेधडक रित्या ह्या व्यापारीनी केल्याचे उघड होत आहे. स्थानिक पोलीस प्रशासन ह्यांचे कर्तृत्वावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होत असतांना जिल्हाधिकारी आणि पणन प्रशासन आता पुढे काय कार्यवाही करतील ह्या कडे सर्व सामान्यांचे लक्ष लागून. बयूरो रिपोर्ट भारत लाईव्ह न्यूज मीडिया !