‘ब्रँड महाराष्ट्राचा’पुरस्कार सोहळ्याची घोषणा

‘ब्रँड महाराष्ट्राचा’पुरस्कार सोहळ्याची घोषणा

गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना महामारीमुळे सर्व सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या आलेल्या

गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रावर आलेल्या कोरोना महामारीमुळे सर्व सामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या आलेल्या संकटावर मात करून स्वतःच्या व्यवसायाची धुरा योग्य सांभाळून सामाजिक भान आणि जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळणा-या मान्यवरांना ‘ब्रँड महाराष्ट्राचा’हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या दिमाखदार सोहळ्याची घोषणा महाराष्ट्र दिनी फ्रेम मी मिडिया चे डायरेक्टर भरत शिंदे यांनी केली. विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील मान्यवरांचा ब्रँड अनेकांना प्रेरणा देणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील न डगमगता पुढे जाता येऊ शकते हे अनेकांनी सिद्ध करून दाखवले आहे. फ्रेम मी मिडिया आणि मिडिया माईंड यांच्या संयुक्त विद्यमाने या यशोगाथा ‘ब्रँड महाराष्ट्राचा’पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने लवकरच घेऊन येत आहे.
 

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button