बातम्या

महानायक अमिताभ बच्चन यांची नात असूनही नव्या नवेली हिला करावा लगातोय ‘या’ गोष्टीचा सामना

महानायक अमिताभ बच्चन यांची नात असूनही नव्या नवेली हिला करावा लगातोय ‘या’ गोष्टीचा सामना

एका मुलाखतीमध्ये नव्याने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. नव्याने झगमगत्या विश्वाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अमिताभ बच्चन यांची नात असूनही नव्याला आतापर्यंत…

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन कायम त्यांच्या सिनेमा आणि अभिनयामुळे चर्चेत असतात. पण आता बिग बी नाही तर, त्यांची नात नव्या नवेली नंदा चर्चेत आली आहे. एका मुलाखतीमध्ये नव्याने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे तर यावेळी नव्याने झगमगत्या विश्वाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अमिताभ बच्चन यांची नात असूनही नव्याला आतापर्यंत एकाही सिनेमाची ऑफर आलेली नाही. नव्या एक उद्योजिका असून सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. आता नव्या बरखा दत्त यांना दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.
मुलाखतीत नव्या म्हणाली, ‘खरं सांगायचं झालं तर, मला अभिनय बिलकूल येत नाही. मला असं वाटतं आपण ज्या क्षेत्रात चांगलं काम करु शकतो, त्या क्षेत्रात स्वतःचं १०० टक्के द्यायला हवं आणि सिनेमांमध्ये मला रस नाही. मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, त्या गोष्टी मला करायला आवडतात. मी अभिनयात उत्तम नाही. मला असं वाटतं मी दुसऱ्या सिनेमात उत्तम आहे.’
 

 

View this post on Instagram

 
A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

 
पुढे नव्या म्हणाली, ‘लोकं मला म्हणतात तुला सिनेमांसाठी ऑफर आल्या असतील, पण मला आतापर्यंत एकाही सिनेमासाठी ऑफर आलेली नाही.’ असं देखील नव्या म्हणाली. नव्या अभिनेत्री नसली तरी कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर नव्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर नव्या कायम फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नव्या अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन यांची मुलगी आहे. श्वेता बच्चन यांनी १९९७ साली उद्योजक निखील नंदा यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहे. नव्या आणि अगस्त्य. अगस्त्य लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘द अर्चिज’ सिनेमातून बिग बींचा नातू अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
‘द अर्चिज’ सिनेमात महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आणि शाहरुख खान यांची मुलगी सुहाना खान देखील झळकणार आहेत. सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शि होणार आहे. सध्या सर्वत्र स्टारकिड्सच्या सिनेमाची चर्चा रंगत आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status