सर्वात धोकादायक पासवर्ड! हे ५० पासवर्ड चुकूनही वापरू नका, एका सेकंदात अकाउंट हॅक होईल

सर्वात धोकादायक पासवर्ड! हे ५० पासवर्ड चुकूनही वापरू नका, एका सेकंदात अकाउंट हॅक होईल

Nord Password च्या ‘Most Nord Password’ ची वार्षिक यादी उघड करते की इंटरनेट युजर्स अजूनही अत्यंत असुरक्षित पासवर्ड वापरतात.

हल्ली ऑनलाइन सिक्यूरिटी आणि सेफ्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्याच्या काळात सर्व व्यवहार, फोटो आणि इतर महत्त्वाचा डेटा ऑनलाइन स्वरूपातच असतो. अशा परिस्थितीत, आपण आपल्या खात्यांचा पासवर्ड स्ट्रॉंग ठेवणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाइन सुरक्षेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पासवर्ड. जेव्हा कुणीही आपल्या संगणक, स्मार्टफोन आणि ऑनलाइन खात्यांमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतं तेव्हा सर्वात आधी आपले पासवर्डच आपल्या खात्यांची सुरक्षा करतं. जेव्हा जेव्हा एखादा हॅकर किंवा सायबर गुन्हेगार तुमची वैयक्तिक माहिती, पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो किंवा तुमच्या खात्याला इतर कोणत्याही प्रकारे हानी पोहोचवू इच्छितो तेव्हा पासवर्डची ताकदच खातं सुरक्षित ठेवतं.

जर तुमच्या खात्याचा पासवर्ड स्ट्रॉंग नसेल आणि त्यांचा अंदाज लावणे खूप सोपे असेल तर कोणीही तुमच्या खात्यात सहज प्रवेश करू शकेल. Nord Password च्या ‘Most Nord Password’ ची वार्षिक यादी उघड करते की इंटरनेट युजर्स अजूनही अत्यंत असुरक्षित पासवर्ड वापरतात.

आणखी वाचा : नवीन फोनचा प्लान असेल तर थोडं थांबा ! OnePlus Nord 2T 5G लवकरच भारतात येतोय, ५० MP रियर कॅमेरा आणि बरंच काही…

२०२१ मध्ये संशोधकाने डेटाची विभागणी केली आणि वेगवेगळ्या देशांच्या आधारे स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस केलं. यानंतर सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या ५० पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली. आज आम्ही तुम्हाला भारतातील इंटरनेट युजर्सद्वारे वापरल्या जाणार्‍या सर्वात सामान्य पासवर्डबद्दल सांगत आहोत जो एका सेकंदापेक्षा कमी वेळात हॅक होऊ शकतो.

आणखी वाचा : Realme ने लॉन्च केला केला बजेट फ्री स्मार्टफोन, २५६ GB स्टोरेजसह जाणून घ्या किंमत आणि बरंच काही….

1- Password2- 1234567893- 123456784- 1234565- 12345678906- 12345677- qwerty8- abc1239- xxx10- iloveyou11- krishna12- 12312313- abcd123414- 1qaz15- 123416- password117- welcome18- 65432119- computer20- 12321- qwerty12322- qwertyuiop23- 11111124- passw0rd25- 98765432126- dragon27- asdfghjkl28- monkey29- abcdef30- mother31- password12332- zxcvbnm33- sweety34- samsung35- iloveu36- asdfgh37- qwe12338- p@ssw0rd39- hello12340- 66666641- asdf123442- lovely43- creative44- engineer45- success46- abcdefgh47- srinivas48- prince49- goodluck50- master

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status