16 वर्षीय आर. प्रज्ञानानंदचा गौरव, नॉर्वे बुद्धिबळ खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

16 वर्षीय आर. प्रज्ञानानंदचा गौरव, नॉर्वे बुद्धिबळ खुल्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले

16वर्षीय तरुण भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदने चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. प्रज्ञानंदने शुक्रवारी नॉर्वे बुद्धिबळ A खुली स्पर्धा जिंकली.

16वर्षीय तरुण भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदने चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. प्रज्ञानंदने शुक्रवारी नॉर्वे बुद्धिबळ A खुली स्पर्धा जिंकली. आर प्रज्ञानानंदने एकूण 9 फेऱ्यांमध्ये 7.5 गुण मिळवून ही कामगिरी केली. अव्वल मानांकित प्रज्ञानंदने अंतिम फेरीच्या सामन्यात आयएम व्ही. प्रणीतचा पराभव केला.

 

प्रज्ञानानंदने एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, ‘मला वाटते की मी या स्पर्धेत उच्च दर्जाचा खेळ केला. मी सर्व सामन्यांमध्ये केलेल्या नियोजनानुसार खेळलो. मला याचा खूप आनंद झाला आहे.

 

गेल्या महिन्यात चेसेबल मास्टर्समध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्यानंतर प्रज्ञानानंदला खूप आत्मविश्वास मिळाला होता. प्रज्ञानानंद म्हणाला, मॅगनस कार्लसन, लिरेन आणि इतरांसारख्या अव्वल खेळाडूंविरुद्ध खेळल्याने तुम्हाला आत्मविश्वास मिळतो. मी फक्त माझ्या तयारीवर अवलंबून राहण्याचा आणि आत्मविश्वासाने खेळण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

बुद्धिबळ ऑलिम्पियाडपूर्वी भारतीय ‘ब’ संघाच्या शिबिराचा भाग होण्यासाठी प्रज्ञानानंद येत्या काही दिवसांत मायदेशी परतणार आहे. त्याने या वर्षी दोन वेळा विश्वविजेता मॅग्नस कार्लसनचा पराभव केला आहे. 

 

चेन्नईचा रहिवासी असलेल्या प्रज्ञानानंदने 2018 मध्ये प्रतिष्ठित ग्रँडमास्टरचे विजेतेपद मिळवले होते. ही कामगिरी करणारा प्रज्ञानानंद हा भारतातील सर्वात तरुण खेळाडू होता आणि त्यावेळी जगातील दुसरा सर्वात तरुण खेळाडू होता. प्रज्ञानानंद सर्वात तरुण ग्रँडमास्टर्सच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने या खेळाडूला मार्गदर्शन केले आहे. 

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status