१२ वर्षां पासून एकच अधिकारी स्थानिक गुन्हा शाखेच्या ग्रामीण विभागात कसे ? काहीतरी मुरतंय : भारत लाईव्ह न्यूज मीडिया !


बुलढाणा : धनवीरसिंग ठाकूर , गेल्या बारा वर्षां पासून एकच ‘ कथित ‘ अधिकारी स्थानिक गुन्हा शाखेच्या विभागात कार्यरत आहेत. संबंधित अधिकाऱ्या वर ग्रामीण क्षेत्रातील अवैध धंदे धारकां कडून बक्कळ रक्कम लाचेच्या स्वरूपात उकळण्याचाही गंभीर आरोप विविध स्तरावरून होत आहे.
ग्रामीण बिट मधील क्षेत्रात गुटखा विक्री , विना परवाना देशी विदेशी दारू विक्री , सट्टा , मटका सोबत रेती उत्खनन करणारे तस्कर ह्यांचे कडून बक्कळ रक्कम अनाधिकृत रित्या आपल्या खाजगी वाहनातून विविध ठिकाणी वेळी अवेळी जाऊन अचानक ह्या सर्व धंदे धारकांना आपण आले असल्याचे सांगून मोजून दोन ते पाच मिनिटात लाच रक्कम घेऊन संबंधित अधिकारी गेल्या बारा वर्षां पासून आपले खिसे ह्या अवैध कमाईतून भरत आहे.
अनेक वेळा ज्यांच्या कडून लाच हि घेतली त्यांचे वर पुन्हा कार्यवाही करण्याचे सोंग हि करण्यात आले असल्याचे माहिती बाहेर येत आहे.
संबधीत प्रकारात सामील काही अज्ञात अवैध धंदे धारकांनी गुप्त बातमीने सदर बातमीला दुजोरा दिला असून. कोट्या वधी रुपयांची उलाढाल ह्या प्रकरणी झाली असल्याची वार्ता शहरात सुरु आहे.
नुकत्याच २२ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान अजून एक नवीन प्रकरण संबंधित अधिकाऱ्याने पूर्णत्वास नेले आहे.
मुक्ताईनगर येथून प्रतिबंधित लक्षा वधी रुपयांचा प्रतिबंधित अवैध गुटखा मुक्ताईनगर ते देवधाबा शेतरस्त्याने पोहोचला. मालवाहू वाहनाला अन्य भ्रष्ट पोलीस कर्मचारी ह्यांचा मदतीने पकडण्यात आला.
लाखो रुपयांच्या गुटखा माल ह्याच्या ऐवज मध्ये गुटखा तस्करांना तब्बल १५ लाख रुपयांची लाच मागण्यात आली. परंतु गुटखा व्याप्यारीने तेवढी रक्कम देण्यात असहमती दाखवली. पुन्हा ईदगाह परिसरात संबंधित पोलीस कर्मचाऱ्या सह स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण बिट च्या ‘ कथित ‘ अधिकारिने अन्य स्थानिक ग्रामीण पोलीस स्टेशन च्या आपल्या साथीदार ह्याचे मध्यस्तीने प्रकरण ३ लाख रुपये घेऊन सोडण्याचे ठरवून. ३ लाख रुपये तेथेच स्वीकारून तो प्रतिबंधित गुटखा भरलेला मालवाहू ट्र्क जाऊ दिला. कुणालाही कानी कुठलीच हालचाल न लागता हा प्रकार घडला. संबंधित प्रकरणाच्या बद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्यांना संपर्क केले असता संपर्क होऊ शकलेला नाही.
जिल्ह्याच्या पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्या ह्या सर्व भ्रष्ट अधिकारी कर्मचारी ह्यांचे वर त्वरित दंडात्मक कार्यवाही होणे अपेक्षित असल्याचे सार्वजनिक स्तरावरून बोलल्या जात आहे.
नवनियुक्त कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. सारंग आव्हाड साहेब ह्या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करतील का ? ह्या प्रकारची मागणी सार्वजनिक रित्या उठत असतांना पुढील सर्व कार्यवाही कडे जनसामान्यांचे लक्ष लागून. भारत लाईव्ह न्यूज मीडिया !