स्वदेशी मशिन्सची परदेशात निर्यात

स्वदेशी मशिन्सची परदेशात निर्यात

एक काळ असा होता जेव्हा भारतात रस्ते बनवण्यासाठी लागणारी उपकरणे व मशिनरी ‍परदेशातून आयात करावी लागत होती. त्याच काळात गुजरात राज्यातील मेहसाणा येथील अनिल पटेल अमेरिकेतून इंजिनिरयरिंगचा अभ्यासक्रम

एक काळ असा होता जेव्हा भारतात रस्ते बनवण्यासाठी लागणारी उपकरणे व मशिनरी ‍परदेशातून आयात करावी लागत होती. त्याच काळात गुजरात राज्यातील मेहसाणा येथील अनिल पटेल अमेरिकेतून इंजिनिरयरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून भारतात परतले. त्यांनी स्वदेशी मशिनरीच्या उत्पादनाबद्दल विचार करून गुजराथ अपोलो कंपनीची स्थापना केली. आज गुजराथ अपोलो कंपनीद्वारे निर्माण केलेल्या मशिन्स जगातील किमान 25 देशांना निर्यात केल्या जातात. माजी उद्योगमंत्री अनिलभाई पटेल यांच्या यशस्वी वाटचाल संदर्भात त्यांच्याशी केलेली बातचीत….आपल्याला रोड पेवर मशिनचे उत्पादन करण्याची प्रेरणा कुणाकडून मिळाली? राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी सुरवातीला कन्स्ट्रक्शन्स डिपार्टमेंटला आधुनिक करण्याचा विचार मांडला. मी त्या दरम्यान अमेरिकेतून इंजिनियरिंगची पदवी प्राप्त करून भारतात परतलो होतो. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनात होतीच. मग अमेरिकी कंपन्यांशी संपर्क साधला आणि गुजराथ सरकारच्या जीआयआयसीच्या सहयोगाने गुजराथमध्ये पहिल्यांदा रोड पेवर मशीनचे उत्पादन सुरू केले. गुजराथ अपोलोच्या नावाने सुरू केलेल्या या कंपनीत अमेरिकी तंत्रज्ञानाचा प्रयोग करून मशिन तयार केल्या जात होत्या. या कामाचे राजीव गांधी यांनी खूप कौतुक केले होते. आज आम्ही जपानमधील कंपनीच्या सहयोगाने अत्याधुनिक पध्दतीचे प्रयोग करून आसफाल्ट बेस मिक्स प्लांट तयार करीत आहोत. आयात होणारी मशिन्स आपण स्वदेशात कशा बनवल्या? 1990 मध्ये डॉ. अब्दुल कलाम (माजी राष्ट्रपती) यांनी या उद्योगाचे आधुनिकीकरण करण्यासाठी टायफेक्टची (टॅक्नॉलॉजी फॉर इन्फोर्मेशन असेसमेन्ट काउन्सिल) संकल्पना मांडली. ज्या मशिन्स 1980-90 मध्ये परदेशातून आयात होत होत्या त्या आमच्या देशात तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केले गेले. या आधारावर शेवटी आम्ही खूप मेहनत करून स्वदेशी बनावटीच्या मशिन्स तयार केल्या. WD आपण आपल्या यशाचे श्रेय कोणाल द्याल?जेवढ्या खर्चात आम्ही मशिन्स तयार केल्या ते करणे विदेशी कंपन्यांसाठी अशक्य होते. अपोलोच्या यशाला पाहून आज मला असं वाटत आहे की माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. मी यशाचे श्रेय आपल्या इंजीनियरिंगचे शिक्षण आणि माझे कुटुंब व थोरले भाऊ मणिभाई यांना देतो, ज्यांनी मला इंजिनियरिंगच्या शिक्षणासाठी विदेशात जाण्यासाठी प्रोत्साहित केले. आजच्या युवकांना यशस्वी उद्योगपती होण्यासाठी काय लक्षात ठेवायला हवे? माझ्या मतानुसार एक यशस्वी उद्योगपती होण्यासाठी सर्वांत अगोदर युवकांनी अभ्यासात लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या आवडीनुसार आपले करियर निवडायला हवे. त्याचबरोबर कॉम्प्यूटर व इंग्रजीचे ज्ञान, पर्सनॅलिटी डेव्हलपमेन्ट आणि आपल्या आवडत्या विषयांवर प्रभुत्व मिळवणे जरूरी आहे.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status