स्तंभेश्वर महादेव

स्तंभेश्वर महादेव
WD गुजरातमधील भडोच जिल्ह्यात कावी नावाचे छोटेसे गाव आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या गावात स्तंभेश्वर महादेवाचे मंदिर आहे. या गावाकडील किनार्यावर भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी मंदिराच्या आत येऊन शिवलिंगावर अभिषेक करून परत जाते. स्तंभेश्वराच्या या मंदिरात शिवलिंग आहे. समुद्र-देवता स्वत: येऊन त्याला अभिषेक घालते, अशी लोकांची समजूत आहे. भरतीच्या वेळी शिवलिंग पूर्णपणे जलमय होऊन जाते. प्रत्येक भरतीला हा प्रकार घडतो. WD तारकासूर शंकराचा परमभक्त होता असे नंतर कार्तिकेयाला समजले. त्यामुळे व्यथित झालेल्या कार्तिकेयाने मनाची शांती मिळविण्यासाठी वधस्थळावर शिवमंदिर बांधावे, असे विष्णूंनी सुचविले. कार्तिकेयाने तसेच केले. समस्त देवगणांनी एकत्र येऊन महिसागर संगम तीर्थावर विश्वनंदक स्तंभाची स्थापना केली. पश्चिम भागात स्थापित स्तंभात शंकर स्वतः आहेत, असे लोक मानतात. म्हणूनच या तीर्थाला स्तंभेश्वर संबोधले जाते. येथे महिसागर नदीचा सागराशी संगम होतो. स्तंभेश्वर महादेव मंदिरात दर महाशिवरात्री आणि अमावस्येला यात्रा भरते. प्रदोष, पौर्णिमेला संपूर्ण रात्र येथे पूजा-अर्चना सुरू असते. कानाकोपर्यातून भाविक येथे शिवशंभूच्या जलाभिषेकाचे अलौकिक दृश्य पाहण्यासाठी येतात.फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा….