सुप्रियांना शरद पवारांपेक्षा जास्त मते

सुप्रियांना शरद पवारांपेक्षा जास्त मते

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राज्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ३६ हजार ८३१ मतांनी विजयी झाल्या, तर याच पक्षाचे संजय दिना पाटील सर्वांत कमी मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे सुप्रियांना पिता शरद पवार यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली. सुप्रियांना ४ लाख ८७ हजार ८२७ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या कांता नलावडे यांना १ लाख ५० हजार ९९६ मते मिळाली. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दीन पाटील यांना २ लाख १३ हजार ५०५ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरीट सोमय्या यांना २ लाख १० हजार ५७२ मते मिळाली.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status