सत्यसाईबाबांचे ‘शांतीधाम’

सत्यसाईबाबांचे शांतीधाम न पाहता दक्षिण भारताची यात्रा पूर्ण होऊच शकत नाही. आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील पुट्टपर्थी या छोट्याशा गावात सत्य साईबाबांचा भव्य आश्रम आहे. हा साई आश्रम (शांतीधाम) सत्य साईबाबांच्या भाविकांच्या वतीने बांधण्यात आला असून ‘प्रशांति निलायम’ (शांती प्रदान करणारे स्थान) या नावाने तो भारतभरात प्रसिध्द आहे. WD दर्शन कार्यक्रमादरम्यान सत्य साईबाबा आपल्या भक्तांमध्ये फिरून काही भाविकांशी संवाद साधतात. त्यांना अंगारा प्रदान करतात. या व्यतिरिक्त भाविकांच्या जत्थ्याला बोलावून त्यांच्याशी वार्तालाप करतात. दरवर्षी 23 नोव्हेंबरला श्री. साईबाबांच्या वाढदिवसानिमित्त आश्रम विद्युत रोषणाईने सजविण्यात येतो. भारतातील राजकीय पुढारी व नामांकित व्यक्ती त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. कसे पोहचाल-महामार्ग- आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथून पुट्टपर्थी 80 किलोमीटरवर आहे. राज्यातील बहुतेक प्रमुख मार्गांनी ते जोडले गेले आहे. त्यामुळे पुट्टपर्थीला जाण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरातून सहज बस सेवा उपलब्ध होते. रेल्वे मार्ग- अनंतपूर रेल्वे स्टेशनहून पुट्टापर्थी 80 किलोमीटरवर असून रेल्वे सेवा उपलब्ध आहे. हवाई मार्ग- हैद्राबाद व बंगळूर विमानतळावरून येथे पोहचता येते. बंगळूर विमानतळ ते पुट्टपर्थी हे अंतर 120 किलोमटीर आहे.