श्री महावीरजी जैन मंदिर

श्री महावीरजी जैन मंदिर
ShrutiWD मंदिरासमोर संगमरवरी दगडाने बनविलेला एक स्तंभही आहे. जैन धर्मियांमध्ये हे मंदिर अतिशय पवित्र मानले जाते. गंभीर नदीकिनारी वसलेले हे मंदिर वर्धमान महावीर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. या मंदिराच्या निर्मितीमागेही एक कथा आहे. शेकडो वर्षांपूर्वी एक गाय रोज सकाळी गवत खायला जात असे व संध्याकाळी मालकाच्या घऱी परतत असे. पण काही दिवासंपासून तिचे दूध आटायला लागले. मालक हैराण झाला. ShrutiWD चिन्हांकित स्वरूपात आहेत. मंदिराचे व्यवस्थापन सध्या मुख्य पुजारी भट्टारक यांच्याकडे आहे. अन्य ब्रह्मचारी त्यांना यात मदत करतात. सकाळी लवकर महावीरजींच्या मूर्तीला स्नान घातले जाते. त्यानंतर तांदूळ, पांढरी आणि पिवळी फुले, चंदन, कापूर आणि सुकामेवा अर्पण केला जातो. त्यानंतर तूपाचे दिवे प्रज्वलित करून आरती केली जाते. ShrutiWD यावेळी पूजेसाठी भाविकांची मंदिर परिसरात मोठी गर्दी जमलेली असते. भाविक अतिशय श्रद्धेने महावीरांची आराधनी करत असतात. सायंकाळी पूर्ण मंदिराला दिव्यांची रोषणाई केली जाते. मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या दुकानात पूजेसाठी लागणारी सर्व सामग्री उपलब्ध आहे. पर्वकाळात भाविक मोठ्या प्रमाणात येत असल्याने त्यांची गरज भागविण्यासाठी अनेक तात्पुरती दुकानेही असतात. राजस्थानी हस्तकलाही यावेळी पहायला मिळते. ShrutiWD कधी जावे- या मंदिराचे दर्शन वर्षभरात केव्हाही घेऊ शकता. पण दर्शनाचा खरा आनंद मार्च ते एप्रिल महिन्यात होणाऱ्या पर्वावेळी घेता येतो. कसे जावे- दिल्ली – मुंबई ब्रॉडगेज लाईनवर श्री महावीरजी रेल्वे स्टेशनहून चंदनगाव साडेसहा किलोमीटरवर आहे. हे स्थळ हिंदौनपासून अठरा, करौलीपासून २९ आणि जयपूरपासून १७६ किलोमीटरवर आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी बस आणि टांग्याचीही व्यवस्था आहे.