श्रीनगरमध्ये मतदान केंद्रावर हल्ला

श्रीनगर- श्रीनगरमधील एका मतदान केंद्रावर आज अज्ञात व्यक्तींनी सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच बॉम्ब हल्ला केला.
श्रीनगरमध्ये मतदान केंद्रावर हल्ला
श्रीनगरमधील एका मतदान केंद्रावर आज अज्ञात व्यक्तींनी सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच बॉम्ब हल्ला केला. एका शाळेतील या मतदान केंद्रावर सकाळी पाच वाजता बॉम्ब फेकण्यात आला. या व्यक्तीने जरी मतदान केंद्राला आपले लक्ष करण्याचा प्रयत्न केला असला तरी बॉम्ब या शाळेच्या मैदानावर फुटल्याने अनर्थ टळल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या भागात शोध अभियान सुरू केले आहे.