शंभर वेळा काशी…एकदा प्रकाशी

शंभर वेळा काशी…एकदा प्रकाशी
आयुष्यात एकदा तरी काशी यात्रेला जावे अशी इच्छा प्रत्येक हिंदुची असते. जीवंतपणी जर हे शक्य झाले नाही तर निदान मृत्युनंतर तरी आपल्या अस्थी काशीला नेऊन गंगेत विसर्जित व्हाव्यात असेच प्रत्येकालाच वाटते. ‘वेबदुनिया’ धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला नेणार आहोत. शंभर काशी यात्रेचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी एक वेळा कराव्या लागणा-या प्रतिकाशीच्या दर्शनासाठी.नंदुरबार जिल्ह्यातील शहादा या तालुक्याच्या गावापासून सुमारे 40 कि.मी. अंतरावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर आहे, दक्षिण काशी ‘प्रकाशा’. तापी, पुलंदा आणि गोमाई नदीच्या या संगमावर शिवशंकराची सुमारे 108 मंदीरे असल्याने या भागास प्रतिकाशी असेही म्हटले जाते. अनेक शतकांपूर्वी सहा-सहा महिन्याचा दिवस आणि रात्र असायचे. या काळात स्वतः शंभू महादेवाने एका सिध्द पुरुषाच्या स्वप्नात येऊन एकाच रात्रीत माझे 108 मंदिरे ज्या भागात बांधली जातील तेथे मी कायमस्वरूपी वास्तव्यास येऊन राहील. काशी यात्रे इतकेच महत्वाची समजली जाणा-या या तीर्थक्षेत्रावर केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे देशभरातून दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येत असतात. ‘तापी महात्म्य’ या प्राचीन धर्मग्रंथात या या भागाची महती सांगितली आहे. असे म्हणतात, की अनेक शतकांपूर्वी सहा-सहा महिन्याचा दिवस आणि रात्र असायचे. या काळात स्वतः शंभू महादेवाने एका सिध्द पुरुषाच्या स्वप्नात येऊन एकाच रात्रीत माझे 108 vikas shimpiWD मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेले प्रकाशा हे ठिकाण शहादा जि. नंदुरबार येथून 40 कि.मी. अंतरावर असून अंकलेश्वर – ब-हाणपूर या राज्य महामार्गावर आहे. नाशिक, मुंबई, पुणे, सुरत आणि इंदूर येथून नंदुरबार किंवा शहादा येथे जाण्यासाठी बससेवा उपलब्ध आहेत.रेल्वे मार्गः जवळचे रेल्वे स्टेशन नंदुरबार असून ते सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर आहे. तेथून शहादा येथे येत असताना रस्त्यातच प्रकाशा हे गाव आहे.