यशाचे राज शाहरुखच्या शब्दात….

यशाचे राज शाहरुखच्या शब्दात….

‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात सुपरस्टार शाहरूख खानने सुरिंदर साहनीची भूमिका साकारून पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भूरळ घातली आहे. प्रेक्षकांसमोर वेगळी प्रतिमा सादर करताना किंग खानच्या विचारात चांगलेच परिवर्तन

‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटात सुपरस्टार शाहरूख खानने सुरिंदर साहनीची भूमिका साकारून पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भूरळ घातली आहे. प्रेक्षकांसमोर वेगळी प्रतिमा सादर करताना किंग खानच्या विचारात चांगलेच परिवर्तन झाल्याचे दिसत आहे. वा…वा… लाजबाब… अशी प्रशंसा मिळवणारा ‘रब ने बना दी जोडी’ हिट झाली. घवघवीत यश प्राप्त केलेल्या या चित्रपटाबद्दल किंग खानच्या शब्दात ऐकूया!… तू चित्रपट साइन करताना विचारपूर्वकच चित्रपट साइन करतो. मग ‘रब ने बना दी जोडी’ हा चित्रपट तुला का साइन करावा वाटला? मी यशराज फिल्म्सचा चित्रपट साइन करताना कुठलाच विचार करत नाही. त्यांच्यात व माझ्यात होणार्‍या चर्चेतच चित्रपट साकरला जातो. यशजींच्या ‘चल आजा पिक्चर कर ले!’ असे सांगण्यात चित्रपट साइन होत असतो. जानेवारी महिन्यातील गोष्ट आहे. आदित्यने मला सांगितले की, त्याने माझ्यासाठी एक कथा लिहिली आहे. तेव्हा मी असा विचार केला की, जर त्याने माझ्यासाठी कथा लिहिली असेल तर तो मला नक्कीच सांगेल. आणि तसेच झाले. त्याने कथा मला दाखवली. मी कथा ऐकल्यानंतर ‘वा क्या बात है।’ असे म्हटल्यावर लगेच आदीने तीन महीन्यानंतर शूटिंगचा नारळ फोडायचा आहे, असे सांगितले. बस्स, मग या चित्रपटात माझे स्थान निश्चित झाले. बॉलीवुडमध्ये असे काही लोक आहेत की, त्यांचा चित्रपट साइन करताना मला काहीच विचार करावा लागत नाही. करण जोहर, फराह खान, यशजी व आदित्य जेव्हा मला विचारणा करतात तेव्हा मी त्यांना नाही म्हणत नाही. WD आदित्य चोप्रांचा हा तिसरा चित्रपट असून तू त्यांच्या तीनही चित्रपटात काम केले आहेस. याविषयी तुला काय वाटते? ‘डर’ या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान आदित्य आणि माझी मैत्री झाली होती. तो या चित्रपटाचा मुख्य सहाय्यक दिग्दर्शक होता. आम्ही दोघे समान असून आमचे विचारही सारखेच आहेत. त्यामुळेच आम्ही चांगले मित्र बनू शकलो. आदित्यप्रमाणे मी पण लाजाळू आणि एकांतप्रिय आहे. मी अभिनेता असल्यामुळे लोकांना माझ्याविषयी अधिक म‍ाहिती आहे. परंतु आदित्यविषयी म्हणावी तशी माहिती नाही. मी सेटवर नेहमी आदित्यला सर म्हणून बोलत असतो. मी आदित्यचे आभार मानू इच्छितो. कारण त्याने मला त्याच्या तिसर्‍या चित्रपटातही काम करण्याची संधी दिली. मला त्याच्या शेवटच्या चित्रपटातही काम करण्याची इच्छा आहे. याबाबत मी स्वत: ला भाग्यशाली समजतो की, त्याच्या प्रत्येक चित्रपटात मला काम करण्याची संधी मिळाली.WD रोमांटिक आयकॉन शाहरुख खानने एका प्रेमकथेत एका सर्वसामान्य व्यक्तीची भूमिका साकरली आहे. याबद्दल काय वाटते? मी नेहमी सांगत आलोय की, मी एका सुपरस्‍टार शाहरूख खान नावाच्या व्यक्तीचा कामगार आहे. मी त्या सुपरस्टार किंवा हिरो किंवा रोमांटिक आयकॉनसाठी काम करत आहे. मी कधीच असा विचार केला नाही की, मी सुपरस्टार आहे. स्वत:‍विषयी सांगायचे असेल तर मी अगदी सर्वसामान्य माणूस आहे. जो सामन्य व्यक्तीप्रमाणे विचार करतो आणि त्यांच्याप्रमाणे राहतो. मी मध्यमवर्गीय कुटूंबातील असल्याचे कधीच विसरत नाही. लोकांना वाटत असले की, मी एक लाख स्क्वेअर फूट जागा असलेल्या बंगल्यात राहतो. माझ्याजवळ महागड्या गाड्या आहेत. परंतु हे सर्व त्या शाहरूख नावाच्या अभिनेत्याला मिळालेलं आहे.रोमांटिक आयकॉनचा पुरस्कारही त्या अभिनेत्याला मिळाला आहे ज्यासाठी मी काम करतो. मी जेवढ्या रोमांटिक भूमिका केलेले चित्रपट आपण पाहिले असतील तर आपल्याला नक्कीच हे जाणवेल की सर्व मध्यमवर्गीय हावभाव असलेल्या भूमिका आहेत. ‘रब ने बना दी जोड़ी’ मधील सुरिंदर तर मला माझ्यासारखाच वाटतो. जर मी स्टार बनलो नसतो तर मीसुद्धा सुरिंदरप्रमाणे मिशा आणि केस रचना असलेला व्यक्ती असतो. मला असे वाटत की, राज आणि राहूल यांनी आता आपला लूक सुरीला देऊन टाकावा. कारण तो मनाने खूप चांगला आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status