महाराष्ट्रात पराभवाचे ‘राज’ कारण- जावडेकर

महाराष्ट्रात पराभवाचे ‘राज’ कारण- जावडेकर


मनसे नेते राज ठाकरे यांनी मराठी मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची गोची झाल्याचे मान्य करत कॉग्रेस- राष्ट्रवादीने ‘राज’ला कारण केल्यानेच महाराष्ट्रात भाजपला कमी जागांवर समाधान मानावे लागल्याची कबुली भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याचे सांगतानाच आता आत्मपरीक्षण करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. भाजपचा या निवडणूकीत पराभव झाला असे म्हणणे चुकीचे असून, आसाम, हिमाचल, गुजरात, कर्नाटक, बिहारमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळाल्याचे ते म्हणाले.उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपचे दुर्लक्ष झाल्याचे जावडेकर म्हणाले.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button