पराभव स्वीकारण्यास भाजपचा नकार

पराभव स्वीकारण्यास भाजपचा नकार

मतमोजणीस आता कुठे सुरुवात झाली असून, इतक्यात आपला पराभव झाल्याचे मान्य करण्यास भारतीय जनता पक्षाने नकार दिला आहे. शेवटपर्यंत आपण निकालांची वाट पाहणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. देशात मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर 215 पेक्षा अधिक जागांवर कॉग्रेस आणि सहकारी पक्षांनी आघाडी घेतली आहे. भाजप आणि सहकारी पक्ष 135 च्या जवळपास आघाडीवर असून, कॉग्रेसने आपल्या विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. निवडणूक निकाल अजूनही पूर्णपणे जाहीर झाले नसल्याने आपल्याला पराभव मान्य नसल्याचे भाजपने म्हटले आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, आसाममध्ये पक्ष आघाडीवर असून, महाराष्ट्रातही अनेक जागांवर भाजप बाजी मारेल असा विश्वास भाजप प्रवक्ते बलबीर पुंज यांनी व्यक्त केला आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status