ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ

ज्योतिर्लिंग सोरटी सोमनाथ

गुजरातमध्ये सौराष्ट्रात वसलेले सोरटी सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देशातील प्राचीन तीर्थस्थळांत सोमनाथ मंदिराचा समावेश होतो. त्याचा उल्लेख स्कंदपुराण, श्रीमदभागवत

WD पुराणात या मंदिराच्या अनुषंगाने एक कथा आहे. चंद्राचे सोम असे नाव होते. तो दक्षाचा जावई होता. एकदा त्यांनी दक्षाची अवहेलना केली. त्यामुळे राग येऊन दक्षाने त्यांचा प्रकाश दिवसादिवसाने कमी होत जाईल असा शाप दिला. अन्य देवतांनी दक्षाला उःशाप देण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी सरस्वती नदी समुद्राला जिथे मिळते, तेथे स्नान केल्यास या शापाचा परिणाम रहाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर सोमाने सौराष्ट्रातील या ठिकाणी येऊन येथे स्नान केले आणि भगवान शिवाची आराधना केली. शंकर येथे प्रकट झाले आणि त्यांनी त्याचा उद्धार केला. त्यामुळे हे स्थान सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.कसे पोहचाल? हवाई मार्ग: सोमनाथपासून 55 किलोमीटरवर केशोड नावाच्या स्थानाहून सरळ मुंबईसाठी हवाईसेवा आहे. केशोड आणि सोमनाथ दरम्यान बस आणि टॅक्सी सेवा आहे.रेल्वे मार्ग: सोमनाथहून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन वेरावळ असून ते सात किलोमीटरवर आहे. येथून अहमदाबाद आणि गुजरातच्या अन्य ठिकाणी जाता येते.रस्ता मार्ग: सोमनाथ वेरावळहून सात किलोमीटर, मुंबईहून 889, अहमदाबादपासून 400, भावनगरहून 266, जुनागढहून 85, पोरबंदरहून 122 किलोमीटरवर आहे. पूर्ण राज्यातून येथे येण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे.रहाण्याची सोय: येथे रहाण्यासाठी गेस्ट हाऊस, आणि धर्मशाळेची व्यवस्था आहे. वेरावळमध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा….

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status