जेजुरीचा खंडोबा

जेजुरीचा खंडोबा

धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत महाराष्ट्रातील जेजुरीच्या खंडोबा (खंडेराव) मंदिरात. ‘खंडोबाची जेजुरी’ या नावाने या गावाची ओळख आहे. धनगर समाज बांधवामध्ये जेजुरीचा खंडोबा ‘म्हाळसाकांत’ किंवा ‘मल्हारी मार्तंड’ या नावानेही ओळखला …

धर्मयात्रेच्या या भागात आम्ही आपल्याला घेऊन जात आहोत महाराष्ट्रातील जेजुरीच्या खंडोबा (खंडेराव) मंदिरात. ‘खंडोबाची जेजुरी’ या नावाने या गावाची ओळख आहे. धनगर समाज बांधवामध्ये जेजुरीचा खंडोबा ‘म्हाळसाकांत’ किंवा ‘मल्हारी मार्तंड’ या नावानेही ओळखला जातो. खंडोबा हे प्रामुख्याने धनगर समाजाचे कुलदैवत आहे. इतर समाजातही खंडोबा कुलदेवता आहे. मराठी परंपरेनुसार विवाहित जोडपे आधी खंडोबाचे दर्शन घेतात व त्यानंतर संसाराला लागतात. जेजुरी हे पुरंदर तालुक्यात पुणे- बंगळूर या राष्ट्रीय महामार्गावर स्थित आहे. जेजुरीला खंडोबाचे मंदिर एका उंच टेकडीवर असून जवळपास दोनशे पायर्‍या चढून मंदिरात जावे लागते. टेकडीवरून संपूर्ण जेजुरीचा विलोभनीय देखावा पाहून प्रवासातील शीण क्षणात नाहीसा होऊन जातो. मंदिराच्या पायथ्याशी प्राचीन दीपमाळ आहे. त्या प्रज्वलित झाल्यानंतर दिव्यांच्या लख्ख प्रकाशात खंडोबाचे मंदिर उजळून निघते. WDWD मध्य प्रदेशातील अहिल्याबाई होळकर यांच्या घराण्याचे जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत होते. मराठी महिन्यानुसार चैत्र, मार्गशीर्ष, पौष व माघ महिन्यात येथे भव्य यात्रा भरते. यावेळी लाखो भाविक जेजुरीला येत असतात. कसे पोहचाल? महामार्ग:जेजुरी पुणे येथून अवघ्या 40 किलोमीटरवर असून पुण्याहून जेजुरीला जाण्यासाठी बस किंवा खाजगी वाहन सहज उपलब्ध होते. रेल्वेमार्ग:पुणे-मिरज रेल्वे मार्गावर जेजुरी हे रेल्वे स्थानक आहे. हवाईमार्ग: जेजुरीपासून सगळ्यात जवळचे विमानतळ पुणे येथे आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status