माहिती विभाग

खेळण्या-बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे दुख:द – राज्यपाल रमेश बैस

खेळण्या-बागडण्याच्या वयात कर्करोगाचे उपचार घेणे दुख:द – राज्यपाल रमेश बैस

मुंबई ,दि.१८ : जे वय खेळण्या-बागडण्याचे आहे, अभ्यास करण्याचे आहे. त्या वयात मुलांना कर्क रोगासाठी उपचार घेताना पाहणे क्लेशदायक आहे. अशा स्थितीत लहान मुलांची व त्यांच्या  पालकांची मानसिक स्थिती काय होत असेल याचा अंदाज देखील बांधता येत नाही. मुलांना त्यांचे  बालपण मिळत नाही. या पार्श्वभूमीवर कर्क रुग्ण मुलांना तसेच त्यांच्या पालकांना टाटा मेमोरियल सेंटर तसेच अशासकीय संस्थांतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे कार्य कौतुकास्पद आहे, असे उद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले.
टाटा स्मृती रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या ५० कर्करोगग्रस्त मुलांनी शनिवारी  दि. 18 आपल्या पालकांसह राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.  लहान मुलांच्या राजभवन भेटीचे आयोजन टाटा मेमोरियल सेंटर – इम्पॅक्ट फाऊंडेशन व क्रिश फाऊंडेशन या संस्थांनी केले होते.
योग्य व वेळेवर उपचार केल्यास लहान मुले कर्क रोगावर पूर्णपणे मात करू शकतात व त्यानंतर  ते  चांगले जीवन जगू शकतात असे राज्यपालांनी सांगितले. यावेळी राज्यपालांनी मुलांना भेटवस्तूंचे वाटप केले तसेच त्यांना  उज्जवल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  राज्यपालांनी टाटा मेमोरियल सेंटरच्या इम्पॅक्ट फाऊंडेशन व क्रिश फाऊंडेशनला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. राज्यपालांशी भेट झाल्यानंतर मुलांनी राजभवनाला भेट दिली.
यावेळी इम्पॅक्ट फाउंडेशनच्या मुख्य अधिकारी शालिनी जटिया, क्रिश फाऊंडेशनचे संस्थापक नवीन शेट्टी, वंदना शेट्टी, लहान मुलांचे कर्क रोग तज्ज्ञ डॉ. वेंकट राम मोहन व लहर बच्छावत आदी उपस्थित होते.
000
         Child Cancer Patients visit Raj Bhavan; meet Governor
Mumbai ; Maharashtra Governor Ramesh Bais interacted with child cancer patients undergoing treatment at the Tata Memorial Hospital at Raj Bhavan Mumbai.  The Governor witnessed a Magic Show with the children and distributed gifts.  The Governor announced a donation of Rs.5 lakh to the organisations providing support to the cancer affected children and their parents.  The children later visited the Raj Bhavan.
The visit of the cancer affected paediatric patients to Raj Bhavan was organised by the Impacct Foundation of the Tata Memorial Centre in association with Krish Foundation.
Shalini Jatia, Chief Officer of the Impacct Foundation of TMC, Navin Shetty, Founder of the Krish Foundation, Vandana Shetty, President of the Foundation, Dr Venkata Rama Mohan, Paediatric Oncologist were present.
                                                                                           ०००

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status