कॉग्रेस म्हणेल ते मंजूर- पवार

कॉग्रेस म्हणेल ते मंजूर- पवार

पंतप्रधानपदाची स्वप्नं रंगवत तिसऱ्या आणि चौथ्या आघाडीशी संपर्कात असलेल्या राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी आता कॉग्रेसवर स्तुती सुमनांची उधळणं केली आहे. आपण कधीही कॉग्रेसपासून वेगळी चूल मांडण्याचा विचार केला नसल्याचे सांगतानाच त्यांनी कॉग्रेस म्हणेल ते सारे काही मंजूर असल्याची भूमिका घेतली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अडवाणी, मनमोहन, आणि मायावती यांच्यासोबतच पवार यांचे नाव घेतले जात होते. आपण या स्पर्धेत नसल्याचे सांगतच पवार यांनी तिसऱ्या आघाडीच्या सभांना उपस्थिती लावली होती.आता यू पी ए चा विजय निश्चित झाल्याने पवार यांनी आपली भूमिका बदलली असून, मनमोहन सिंग हेच पंतप्रधानपदाचे योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status