कॉंग्रेसशी युती न करणे ही चूक: लालू

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाशी युती न करणे ही सर्वात मोठी चूक झाली, अशी कबुली राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिली.
कॉंग्रेसशी युती न करणे ही चूक: लालू
लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाशी युती न करणे ही सर्वात मोठी चूक झाली, अशी कबुली राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष व रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिली.पटनामध्ये पत्रकारांशी बोलतांना लालूप्रसाद यादव यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीतील पराभव आम्ही मान्य करतो. या निवडणुकीत आम्ही अनेक चुका केल्या आहेत. सर्वात मोठी चुक ही कॉंग्रेसशी युती न करण्याची होती. त्याचा फायदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळाला. कॉंग्रेस, लोकजनशक्ती पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाची युती झाली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती.