केरळमधील आट्टुकाल देवीचे मंदिर

केरळमधील आट्टुकाल देवीचे मंदिर
WD आट्टुकाल गावातील मुल्लुवीड कुटुंबाला ही देवी पहिल्यांदा दिसली. तोच मंदिराच्या उत्पत्तीचा आधार मानला जातो. ही देवी पतिव्रताधर्माच्या प्रतीकाच्या रूपात प्रख्यात असलेली कणकींचा अवतार मानली जाते. पोंकाला महोत्सवWD स्वयंसेवक, सेवा समिती, मंदिर ट्रस्टचे स्वयंसेवक या सर्व प्रकारच्या सेवेसाठी कटिबद्ध असतात. प्रयागच्या कुंभ मेळाव्याची आठवण देणारा अशी ही पोंकाला यात्रा आहे. विविध प्रकारचे लेपन करून देवीला सुंदर बांगड्या घातल्या जातात. तेव्हाच उत्सवाचा शुभारंभ होतो. उत्सवाच्या नऊ दिवसांमध्ये संपूर्ण मूर्ती लेपयुक्त होऊन जाते. या काळात देवीचे चरित्र गायले जाते. पांड्य राजाच्या वधापर्यंत हे चरित्र गान केले जाते.पांड्य राजाच्या वधापर्यंत आनंदोत्सव चालतो. सोबतच पोंकाला चूल पेटविली जाते. नंतर सायंकाळी एका निश्चित वेळी पुजारी पोंकाला पात्रांमध्ये तीर्थजल शिंपडतात तेव्हा विमानातून पुष्पवृष्टी होते. देवीच्या नैवेद्य-स्वीकृतीने प्रसन्न होऊन नैवेद्य डोक्यावर धरून स्त्रिया परत जाऊ लागतात. कसे पोहोचाल?तिरूवनंतपूरम सेंट्रल रेल्वे स्टेशनपासून हे पीठ फक्त दोन किलोमीटरवर आहे. येथील विमानतळापासून हे ठिकाण सात किलोमीटरवर आहे. भारताच्या सर्व प्रदेशांमधून येथे पोहचता येते. तिरूवनंतपुरम पोहचणारे भाविक रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवरून सरळ आट्टुकालला पोहोचू शकतात. या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी बस, टॅक्सी आणि ऑटो रिक्शा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. श्री पद्मनाभस्वामींच्या मंदिरासमोरून दोन किलोमीटर दक्षिण-पूर्वेला पायी चालत गेलो तर तीस मिनिटाच्या अंतरावरच हे मंदिर आहे.