ओरीसामध्ये बीजदची ‘हॅटट्रिक’

ओरीसामध्ये बीजदची ‘हॅटट्रिक’


ओरीसा विधानसभेत ४५ जागा जिंकून व ४० जागांवर आघाडी घेत बिजू जनता दलाने पुन्हा एकदा सरकार बनविण्यात आघाडी घेतली आहे. ओरीसात सलग तिसर्‍यांदा सरकार बनविणारे नवीन पटनाईक पहिलेच मुख्यमंत्री होतील. राज्यात कॉंग्रेसने सात मतदारसंघात विजय मिळवला असून २१ ठिकाणी आघाडी घेतली आहे. लोकसभा मतदारसंघात बीजदने तेरा जागांवर आघाडी घ ेतली आहे. पक्षाचे साथीदार असलेल्या भाकपने एका जागेवर आघाडी घेतली आहे. याशिवाय सहा ठिकाणी कॉंग्रेसचा विजय पक्का आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा झटका बसला असून फक्त तीन विधानसभा मतदारसंघात त्यांना विजय मिळाला आहे. बारा ठिकाणी ते आघाडीवर आहेत. गेल्या वेळी पक्षाचे ३२ आमदार होते.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button