आठवलेंनी फोडले कॉंग्रेसवर खापर

आठवलेंनी फोडले कॉंग्रेसवर खापर

शिर्डीतून झालेल्या पराभवाचे खापर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कॉंग्रेसवर फोडले आहे. त्यासाठीच त्यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराची मदत केली असा आरोप करून, आपल्याच माणसांनी दगा दिल्याची खंत व्यक्त केली. त्याचवेळी आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला दलित मतांची गरज पडेल, हे त्यांनी विसरून चालणार नाही, असा इशाराही दिला. शिवसनेच्या भाऊसाहेब वाघचौरेंनी आठवलेंचा पराभव केला. आठवले १९९८ पासून खासदार आहेत. मुंबईनंतर आठवले पंढरपूरहून निवडणूक लढवत होते. पण यावेळी पंढरपूर राखीव झाल्याने त्यांना शिर्डीहून निवडणूक लढवावी लागली होती.

Go to Source

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status