अरण्मूल येथील पार्थसारथी मंदिर

अरण्मूल येथील पार्थसारथी मंदिर

केरळमधील प्राचीन मंदिरांपैकी अरण्मूल श्री पार्थसारथी मंदिर आहे. श्रीकृष्ण येथे पार्थसारथी रूपात वसले आहेत. पथानमथिट्टा जिल्ह्यात पंबा नदीच्या किनारी हे मंदिर आहे. निशस्त्र कर्णाला मारल्याचे प्रायश्चित्त म्हणून अर्जुनाने हे मंदिर बांधल्याचे मानले …

केरळमधील प्राचीन मंदिरांपैकी अरण्मूल श्री पार्थसारथी मंदिर आहे. श्रीकृष्ण येथे पार्थसारथी रूपात वसले आहेत. पथानमथिट्टा जिल्ह्यात पंबा नदीच्या किनारी हे मंदिर आहे. निशस्त्र कर्णाला मारल्याचे प्रायश्चित्त म्हणून अर्जुनाने हे मंदिर बांधल्याचे मानले जाते. हे मंदिर मुळात शबरीमाला जवळील नीलकल येथे तयार करण्यात आले. त्यानंतर सहा बांबूंच्या तराफाच्या सहाय्याने ते येथे आणण्यात आले. म्हणूनच या भागाचे नाव अरण्मूल पडले. मल्याळममध्ये याचा अर्थ बांबूचे सहा तुकडे असा होतो. दरवर्षी भगवान अय्यपा यांचे सुवर्ण अंकी (पवित्र दागिने) येथून शोभायात्रा काढून मिरवत शबरीमलापर्यंत नेले जातात. ओणम या केरळमधील प्रसिद्ध उत्सवादरम्यान अरण्मूल येथे नौकांची शर्यतही आयोजित केली जाते. WD गरूडवाहन इजुनल्लातू हा एक महत्त्वाचा उत्सव आहे. यात शोभायात्रा काढली जाते. भगवान पार्थसारथी यांना गरूडाच्या रथावर बसवून पंबा नदीवर नेले जाते. यावेळी मंदिराला मोठा नजराणा भेट दिला जातो. याशिवाय खांडवनादाहनम नावाचा एक उत्सव धनुस या मल्याळम महिन्यात साजरा केला जातो. यात मंदिराच्या समोर झाडांची पाने, फांद्या यांच्या सहाय्याने जंगल साकारले जाते. मग महाभारतातील खांडववन दहनाचा देखावा साकार केला जातो. श्रीकृष्ण जन्माष्टमीही येथे जोरदार साजरी होते. कसे जाल? रस्ता मार्ग- पथानमथिट्टा जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अरण्मूल सोळा किलोमीटरवर आहे. त्यासाठी बस उपलब्ध आहेत. रेल्वे मार्ग- चेनगन्नूर हे जवळचे रेल्वेस्टेशन आहे. तेथून १४ किलोमीटरवर अरण्मूल आहे. हवाई मार्ग- येथून जवळचे विमानतळ कोची आहे. अरण्मूलपासून ते ११० किलोमीटरवर आहे.

Go to Source

Show More

Related Articles

Back to top button
DMCA.com Protection Status