अंबाजी येथील अंबा माता

अंबाजी येथील अंबा माता
या देवीसर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै-नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः… WDWD गब्बर येथील अंबेचे मंदिर प्राचीन आहे. आर्यांच्या अस्तित्वापूर्वीपासून अंबामातेची पूजा केली जाते असे मानले जाते. आर्यांनी ही देवी स्वीकारून तिची आराधना पुढे सुरू ठेवली. गब्बर डोंगरावर असलेली पदचिन्हे व रथाच्या चाकाचीही चिन्हे मातेचीच आहेत, अशी श्रद्धा आहे. येथेच श्रीकृष्णाचे मुंडन करण्यात आल्याचे सांगितले जाते. येथे सुवर्ण यंत्र कोरण्यात आले असून त्यात ५१ श्लोक आहेत. WDWD हजारो वर्षांपासून भाद्रपदातील पौर्णिमेला लोक अंबा मातेच्या दर्शनाला येत असतात. माता भक्तांची मनोकामना पूर्ण करते असे मानले जाते. याशिवाय प्रत्येक पौर्णिमेला येथे लोक मेलो नावाची प्रसिद्ध यात्रा भरते. देशाच्या कानाकोपर्यातून लोक दर्शनासाठी येथे येत असतात. विशेष आकर्षण- नवरात्रात भाविकांची येथील मंदिरात गर्दी असते. संपूर्ण गुजरात तसेच बाहेरच्या राज्यातूनही लोक येथे दर्शनासाठी येत असतात. या काळात येथे भवई व गरबा या नृत्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. सप्तशतीचा पाठही या काळात होतो. भाद्रपद पौर्णिमेला भाविक गब्बर डोंगरावर जाऊन तेथील देवीचे दर्शन घेतात.कसे जाल- अहमदाबादहून 180 किलोमीटर माउंट अबूहून45 किलोमीटर दिल्लीहून 700 किलोमीटर जवळचे स्टेशन- अबू रोड जवळचे विमानतळ- अहमदाबाद